गडहिंग्लज : विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडविण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. आजच्या घडीला विद्यार्थ्यांनी अपडेट राहून आपल्या अभ्यासात सातत्य ठेऊन आपले करिअर घडवावे. पदवी पर्यंतचे शिक्षण आपल्या जीवनात टर्निंग पॉईंट आहे. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण घेऊन आपले जीवन समृद्ध करणे आवश्यक आहे. आपल्या जीवनात सक्षम होण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन सेवानिवृत्त डी.वाय.एस.पी. श्री जगदीश काकडे यांनी केले. येथील शिवराज महाविद्यालयात आयोजित बी.कॉम.तीनच्या शुभेच्छा समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे होते. प्रारंभी यांनी स्वागत व प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.दीपक खेडकर यांनी केले. पाहुण्यांच्या परिचय डॉ.महेश चौगुले यांनी करून दिला. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सेवानिवृत्त डी.वाय.एस.पी. श्री जगदीश काकडे पुढे म्हणाले- विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाशी आस्था ठेऊन जीवन घडविण्यासाठी सज्ज व्हा. सत्य-असत्याची पडताळणी करून चांगल्या विचारातून चांगले घडण्याचा प्रयत्न करा. बदलत्या जगाबरोबर आपणही बदलांचा स्वीकार करा व गुणात्मक जीवन जगण्याचा प्रयत्न करा असेही त्यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांनी शिवराज विद्या संकुल हे संस्काराचे केंद्र आहे. आपण कसे घडावे याचे सविस्तर ज्ञान विद्यार्थ्यांना शिवराज मध्ये दिले जाते. विद्यार्थ्यांनी केवळ पदवी शिक्षण घेऊन थांबू नये तर पदव्युत्तर शिक्षण घेऊन आपल्याला क्षमता सिद्ध करणे करणे गरजेचे आहे. देशाबाहेर देखील करिअर घडविण्याच्या खूप संधी आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे असे प्रतिपादन केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ.अनिलराव कुराडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आदर्शवत व्यक्तिमत्वे कशी घडली आहेत. याचा वस्तुपाठ म्हणजे संस्थाध्यक्ष आदरणीय कुराडे सर व काकडे साहेब हे आहेत. कष्टातून घडलेल्या या व्यक्तीमत्वांचा आदर्श घेऊन आपली वाटचाल अधिक गतिमान होणे काळाची गरज असल्याचे स्पष्ट करून त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. ऋषिकेश मांगले व शुभदा शेंडगे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.बी.एम.जाधव यांनी केले.