आजरा : एरंडोळ येथील अकरावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सिद्धेश अरविंद परीट (वय १७) असे मृताचे नाव आहे. गुरूवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची वर्दी सिद्धेशचे वडील अरविंद परीट यांनी आजरा पोलीसात दिली आहे.
याबाबत पोलीसातून मिळालेली माहिती अशी, सिद्धेश आजरा येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिकत होता. वार्षिक परीक्षेचा पेपर देऊन गेल्यानंतर त्याने राहत्या घरी माडीवर गळफास घेऊन आत्महत्या केली. याची नोंद आजरा पोलिसात झाली असून पुढील तपास आजरा पोलीस करीत आहेत. सिद्धेश याच्या पश्चात आई, वडील, आजी, बहिण, भाऊ असा परिवार आहे.
दहा दिवसात दोघांची आत्महत्या