शिवराज महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणी व मेरा पहिला वोट देश के लिए अभियान संपन्न

KolhapurLive

गडहिंग्लज : शिवराज महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि निवडणूक साक्षरता मंच यांच्या संयुक्त विद्यमाने १८ वी लोकसभा निवडणूक निमित्त्ताने नवीन मतदार नोंदणी आणि मेरा पहिला वोट देश के लिए अभियान राबविण्यात आले. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आणि प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉ.जी.जी.गायकवाड यांनी नवीन मतदार नोंदणी संदर्भात मार्गदर्शन केले. नवीन मतदार नोंदणीसाठी कोणता फॉर्म भरावयाचा आहे शिवाय त्यासाठी आवश्यक कागदपत्रे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

‘मेरा पहिला वोट देश के लिए’ या संदर्भात मार्गदर्शन निवडणूक साक्षरता मंचचे समन्वयक डॉ.ए.जी.हारदारे यांनी प्रथम मतदान करणाऱ्या विद्यार्थी मतदारांचे स्वागत केले तसेच १८ व्या लोकसभेसाठी जास्तीत–जास्त मतदारांनी मतदान करावे याविषयी आवाहन केले. तसेच एक मताचे महत्व देशासाठी किती महत्वाचे आहे याविषयी मार्गदर्शन केले. मताधिकार, लोकशाही आणि आपले भविष्य याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी निवडणूक नोडल अधिकारी प्रा.दत्तू जाधव यांनी मतदार नोदणी आणि मतदान करणे याविषयी माहिती दिली.

मतदार जनजागृती अभियान अंतर्गत महाविद्यालयात निबंध स्पर्धा व रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या कार्यक्रमामध्ये डॉ.संजय सावंत, डॉ.अशोक मोरमारे, डॉ.महेश चौगुले, इतर प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संस्था सचिव डॉ.अनिलराव कुराडे व प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांचे मौलिक असे मार्गदर्शन मिळाले.