लोकसभा निवडणुकीचं बिगुल आज वाजणार आहे. दुपारी तीन वाजता देशातल्या सर्वात मोठ्या राजकीय उत्सवाचा प्रारंभ कधी होणार? राजीव कुमार यांनी निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली आहे. या माहितीत त्यांनी नवमतदार किती आहेत? वृद्ध मतदार किती आहेत? तरुण मतदार किती आहेत? महिला आणि पुरुष मतदार किती आहेत? याची सविस्तर माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसरी टर्मही आमचीच असल्याचा दावा केला आहे. तर राहुल गांधी आणि इंडिया आघाडीने तिसऱ्यावेळी मोदी पंतप्रधान होणार नाहीत असं म्हटलं आहे. निवडणूक आयोग आता किती टप्प्यांमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर करतात आणि निकालाची तारीख काय असेल ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
तिसरा टप्पा – ७ मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
निवडणुकीत दोन वेळा मतदान करणाऱ्यांवर कठोरातील कठोर कारवाई करण्याचा मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिला आहे. निवडणुकीत कोणत्याही प्रकारे पैशाचा गैरवापर होऊ देणार नाही. मनी आणि मसल पॉवरला निवडणुकीत थारा राहणार नाही. दारू आणि साड्या वाटपावर आमची करडी नजर राहणार असून असा प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
५४३ जागांवर लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी, दुसरा टप्पा २६ एप्रिलला, तिसरा टप्पा ७ मे रोजी, चौथा टप्पा १३ मे रोजी, पाचवा टप्पा २० मे रोजी सहावा टप्पा २५ मे रोजी तर सातवा आणि अखेरचा टप्पा १ जून रोजी पार पडणार आहे. ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे अशी माहिती आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे.