शिवराज महाविद्यालयात जागतिक चिमणी दिवस साजरा

KolhapurLive


गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने ‘जागतिक चिमणी दिवस’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पक्षीमित्र व पर्यावरण प्रेमी श्री अनंत पाटील होते तर शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष अॅड.दिग्विजय कुराडे व प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रारंभी प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा.किशोर अदाटे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात चिमणीचे महत्व आणि जागतिक चिमणी दिन साजरा करण्याचे महत्व सांगितले. प्रमुख पाहुणे म्हणून पक्षीमित्र व पर्यावरण प्रेमी श्री अनंत पाटील यांनी पक्ष्यांचे महत्व स्पष्ट करून चिमणीबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास प्राणीशास्त्र व वनस्पतीशास्त्र विभागाच्या बी.एस्सी भाग एक व दोनच्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थ्यांनीनी तयार केलेल्या पोस्टर व घरट्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले. यावेळी प्रा.अनिल मगर, डॉ.विद्या देशमुख, प्रा.श्रीधर सावेकर यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थितीत होते.