संत गजानन रुग्णालयात मधुमेही रुग्णांसाठी मोफत उपचार, मार्गदर्शन
महागाव : येथील संत गजानन महाराज रुग्णालयात मधुमेही रुग्णांच्या उपचारासाठी स्वतंत्र विभागाची निर्मिती केली असून यात तज्ञ डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली रक्त, न्यूरोपॅथिक, डायबेटिक फूट, डोळे तपासणी, हाडातील ठिसूळपणासह इतर तपासणी उपचार व आहार मार्गदर्शन मोफत केले जाणार आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेही रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. यावर वेळीच उपचार न केल्यास हृदयविकार, पक्षाघात, अंधत्व, किडनी विकार, डायबेटीक फूट सारख्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मधुमेहाची लक्षणे अनेक असून ती वेळीच ओळखणे गरजेचे आहे. सतत तहान लागणे, वारंवार लघवी होणे, अधिक भूक लागणे, वजन कमी होणे थकवा येणे, अंधुक दिसणे यासारखे लक्षणे दिसतात. यावर वेळीच उपचार होणे गरजेचे आहे. मधुमेह रुग्णांसाठी मोफत उपचार व आहार सल्ला देण्यासाठी स्वतंत्र तज्ञ डॉक्टर सह स्वतंत्र युनिट सुरू केले असून अधिक माहितीसाठी हॉस्पिटलशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. यशवंत चव्हाण यांनी केले आहे.