गडहिंग्लज : शिवराज महाविद्यालयात महिला सबलीकरण समिती व ज्युनिअर व सिनिअर विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख व्याख्यात्या म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्या सौ क्रांतीदेवी कुराडे होत्या, तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस.एम.कदम होते, या कार्यक्रमाची सुरुवात कुंडीतील रोपाला मान्यवरांच्या हस्ते पाणी घालून करण्यात आले. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्रा. आशा. पाटील यांनी केले. या कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद सदस्या सौ क्रांतीदेवी कुराडे यांनी 'महिला सबलीकरण' या विषयावर मार्गदर्शन करताना समाजामध्ये आज स्त्री शक्तीचा जागर होणे काळाची गरज आहे. स्त्रियांनी सक्षम होणे आवश्यक आहे. आज स्त्रिया सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत, त्यांनी घेतलेली झेप नक्कीच प्रेरणादायी आहे. समाजात स्त्री-पुरुष समानता जपणे आवश्यक आहे. समाजात स्त्रियांचा आदर होणे आवश्यक आहे. स्त्रियांनी स्वयंपूर्ण होणे अत्यंत महत्वाचे आहे. यावेळी पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापिका, प्रशासकीय कर्मचारी सर्व विद्यार्थिनी उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दर्शनी बेलेकर यांनी केले. आभार प्रा. पौर्णिमा कुराडे यांनी मानले.