बॅरिस्टर नाथ पै शाळेस तीस वर्षांनी बेंचसाठी मिळाला वीस लाखाचा निधी

KolhapurLive

गडहिंग्लज : छत्रपती शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी मोफत शिक्षणाचा कायदा करुन बहुजनांच्या शिक्षणाचा पाया घातला. ग्रामीण भागातील शाळा व विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी सुविधा मिळत नाहीत. अशा शाळांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणे हा माझा राजधर्मच आहे.असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.

 येथील बॅरिस्टर नाथ पै शाळेत त्यांच्या प्रयत्नातून नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या  शाळांना बेंच वितरणसाठी वीस लाख रुपयांचे उपलब्ध झालेल्या निधीतून बेंच वितरणवेळी ते बोलत होते. विशेष म्हणजे या शाळेची 1995 पासून बेंचची मागणी होती. ती श्री.घाटगे  यांच्यामुळे पूर्ण झाली. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
 अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सुवर्णा पवार होत्या.

   त्यानंतर येथे राजगुरुनगरमधील रस्ता डांबरीकरण व गटर्स कामाचा शुभारंभ तसेच बड्याचीवाडी येथे जल जीवन मिशन,रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ व सोलर हायमास्ट  दिव्यांचे लोकार्पण श्री घाटगे यांनी केले. 
  श्री.घाटगे पुढे म्हणाले,ग्रामीण भागात अपुऱ्या  सोयी सुविधा असतानासुद्धा केवळ मेहनती शिक्षकांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी गुणवत्तेत चमकत आहेत. या शिक्षकांच्या पाठीशी आपण नेहमीच ठाम राहिलो आहोत. अशा गुणवंत शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी सहकारातील आदर्श नेते स्व. राजे विक्रमसिंह घाटगे  यांच्या नावाने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करीत आहोत. राजे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या माध्यमातून ई लर्निंग सुविधा उपलब्ध करून देत आहोत. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या माध्यमातून कागल विधानसभा मतदारसंघातील शाळेतील एकशे तीस वर्गांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे.तो  आणखी  उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे. 
उपाध्यक्ष राजेंद्र तारळे म्हणाले,नगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळांसह ग्रामीण भागातील शाळांना आणखी सोयी-सुविंधाची गरज आहे. राजे समरजितसिंह घाटगे  यांच्या माध्यमातून त्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करु.
  यावेळी प्रीतम कापसे, सुदर्शन चव्हाण,  संग्राम आसबे, भीमराव कोमारे, चंद्रकांत कुंभार, नीलंबरी भुईम्बर, आशा देवर्डे,विश्वनाथ खोत, प्रतिभा पाटील,मानसिंग जाधव, अभिनंदन अजहर बोजगर, संतोष कुंभार,दिगंबर विटेकरी आदी उपस्थित होते.
बड्याचीवाडी  येथे सरपंच बाजीराव खोत,उपसरपंच वसंत पवार,मारुती राक्षे, जनार्दन खोत, ग्रामपंचायत सदस्य बाजीराव खोत, अविनाश दळवी यांचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
  येथे राजगुरुनगरमाधील रस्ता डांबरीकरण व गटर्स कामाचा शुभारंभ तसेच बड्याचीवाडी येथे जल जीवन मिशन,रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ व सोलर हायमास्ट  दिव्यांचे लोकार्पण श्री घाटगे यांनी केले. 

बड्याचीवाडी  येथे सरपंच बाजीराव खोत,उपसरपंच वसंत पवार,मारुती राक्षे, जनार्दन खोत, ग्रामपंचायत सदस्य बाजीराव खोत, अविनाश दळवी यांचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

छायाचित्र- गडहिंग्लज येथे बॅरिस्टर नाथ पै शाळेत बेंच वितरणप्रसंगी शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे नेते राजे समरजितसिंह घाटगे, राजेंद्र तारळे, मुख्याध्यापिका सुवर्णा पवार व इतर