गडहिंग्लज : अलका भोईटे, अरूणा शिंदे, उज्वला दळवी यासह इतर महिला सहकाऱ्यांच्या आणि नागरिकांच्या सहकार्याने 27 गावच्या दारूबंदीसह अनाथ असलेल्या अनेक मुलींचा संसार स्वखर्चाने उभा करत सामाजिक बांधिलकीचा वसा जपणारी एक सावित्रीची लेक. ज्या लेकीनं एच आय व्ही ग्रस्त लहान मुलांना मदतीसह महिलांना विविध क्षेत्रात वाव मिळावा यासाठी विशेष प्रयत्न केले. वयाच्या एकोणीस वर्षांपासून सामाजिक कामात हिरहिरीने सहभाग घेतला अशा *गडहिंग्लजच्या सौ. गीता सुधाकर पाटील.
आज महिला दिनाच्या औचित्याने त्यांच्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कामांचा आढावा घेतला.
लेझिम आणि लाठीकाठी खेळता खेळता अनेक समाजोपयोगी गोष्टी सुचत गेल्या आणि त्यांनी आपल्या कल्पकतेतून अनेक गोष्टी अगदी सहजपणे करून दाखवल्या. घर आणि संसार सांभाळत सामाजिक काम करणं आणि त्यातल्या त्यात एखाद्या महिलेनं अशी कामं करणं ही काही सोपी गोष्ट नाही. पण, प्रसिद्धीच्या झोतात न येता त्यांचे पती आणि मुले यांच्या साथीच्या जोरावर त्यांचं हे काम सुरू होत.
गीता यांनी समाजकार्याच 18 वर्षापूर्वी लावलेलं रोपटं नेहमीच्या हातभाराने आज वटवृक्ष होताना दिसत आहे.
आज त्या निर्भया दक्षता समिती, जिजाऊ ब्रिगेडच्या शहर सरचिटणीस ते राष्ट्रवादीचा शहर प्रमुख अशा विविध पदांची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत.
महिलांना लेझिम शिकवण असो की, लाठीकाठी प्रशिक्षण, क्लासिकल डान्स असो की सदाबहार गाणी तिथे याचं नावं नक्कीच घेतलं जात. सखी महिला मंडळाच्या आणि बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठीचे त्यांचे कायम प्रयत्न सुरू असतात. महिलांच्या अनेक अडचणीत आपला मदतीचा हात सतत पुढे करणाऱ्या या सखीनं आजच्या महिलादिनी थांबलेल्या हाताना लिहितं केलं. अशा या "सखी"ला काळभैरीनं त्यांना महिलांच्या विकासासाठी अनेक विधायक कामं करण्याची अजून ऊर्जा देवो आणि त्यांचं समाजकार्य असच बहरत राहो अशा सदिच्छेसह
या "सखी"ला आजच्या महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा....