शिवराज महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागामार्फत भौतिकशास्त्रमधील विद्यार्थ्यांना संधी या विषयावर मार्गदर्शन संपन्न

KolhapurLive

गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागामार्फत सामंजस्य करार अंतर्गत ‘भौतिकशास्त्रातील विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन संपन्न झाले.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्रा.गौरव पाटील यांनी केले. या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णीचे डॉ.आर.ए.घोरपडे व र.भा.माडखोलकर महाविद्यालय चंदगडचे प्रा.बी.एम.पाटील यांची उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमात यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णीचे डॉ.आर.ए.घोरपडे यांनी विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्र विषयात आपले करिअर करणे गरजेचे आहे. भौतिकशास्त्र विषयातील विद्यार्थ्यांना या विविध क्षेत्रात करिअर करण्याची संधी मोठ्याप्रमाणात उपलब्ध आहेत. याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेणे गरजेचे असल्याचे सांगून भौतिकशास्त्र विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या कोण-कोणत्या क्षेत्रात कशाप्रकारे संधी उपलब्ध आहेत याबाबत त्यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले. तसेच र.भा.माडखोलकर महाविद्यालय चंदगडचे प्रा.बी.एम.पाटील यांनी नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थीभिमुख अभ्यासक्रमाचा प्राधान्याने समावेश करण्यात आला आहे. हे शैक्षणिक धोरण विद्यार्थी हिताचे असल्याचे सांगून ते आजच्या घडीला विद्यार्थ्यांना कशाप्रकारे आवश्यक आहे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. आभार डॉ.विजय सावंत यांनी मानले.