गडहिंग्लज : जागतीक महिला दिनानिमित्त मातृसेवा फाउंडेशन ठाणे व शिक्षक ध्येय महाराष्ट्र याच्या संयुक्त सहकार्याने देण्यात येणारा राज्यस्तरीय कर्तुत्वान महिला पुरस्कार प्रदान केंद्रशाळा भडगाव शाळेच्या विषयशिक्षिका सौ. रेखा आप्पासाहेब नाईक यांना जाहिर झाला आहे. गडहिंग्लज तालुक्यातील चन्नेकुपी गावच्या रेणुका सामाजिक व शैक्षणिक सेवा संस्थेच्या त्या संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांचे शैक्षणिक व सामाजिक काम खूप मोठे आहे
याच उपक्रमासोबतच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अंधश्रद्धा निर्मुलन, बेरोजगारी महिला सक्षमीकरण, बचत गट स्थापना किशोरवयीन मुलामुलीना मार्गदर्शन, व्यसनमुक्ती मार्गदर्शन, दाम्पत्य जीवनातील अडचणी सोडवणूक, निराधार मुले, वयोवृदधचिदिखभाल ह्या त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला.