गडहिंग्लज : जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीचे व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. खरेतर व्यवस्थापन हे प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाचे आहे. हे व्यवस्थापन वेळीच होणे काळाची गरज आहे तरच त्याचे योग्य असे नियोजन करू शकतो. त्यासाठी आपण सर्वांनी व्यवस्थापन व नियोजनास महत्व दिले पाहिजे, आज येणाऱ्या अनेक अडचणी व समस्या पाहता त्याचे वेळीच निवारण करण्यासाठी आजच्या पिढीला आपत्ती व्यवस्थापनही समजून घेणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास केंद्राचे संचालक डॉ. पी. टी. गायकवाड यांनी केले. येथील शिवराज महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ शिवसहाय्यता व आपत्ती मिक्षारर्ण किरण व व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोल्हापूर जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे होते. प्रारंभी शिवाजी विद्यापीठाच्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यशाळेचे उदघाटन कुंडीतील रोपाला मान्यवरांच्या हस्ते पाणी घालून करण्यात आले. स्वागत प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी केले. प्रास्ताविक कार्यशाळा समन्वयक डॉ.डी.पी. खेडकर यांनी केले.
या कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.टी.एम. चौगुले यांनी शिवाजी विद्यापीठ नेहमीच लोकाभिमुख उपक्रम राबवित असते, तसेच आपत्ती व्यवस्थापनाचे स्वतंत्र कक्ष स्थापन केले आहे. याव्दारे प्रशिक्षण देऊन अनेक स्वयंसेवक घडवीत आहे. शिवाजी विद्यापीठाच्यावतीने एन.एस.एस.च्या माध्यमातून समाजासाठी आपत्ती निर्माण होण्यापूर्वी व आपत्तीनंतर करावयाच्या उपाययोजना याबाबत योग्य ते प्रशिक्षण देऊन सर्वतोपरी मदत मोहीम राबवीत असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थाध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांनी आपत्ती निवारण होणे अत्यंत महत्वाचे आहे. हे नव्या पिढीला समजण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचा स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करून त्याचा स्वतंत्र कोर्स सुरु करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने प्रयत्न करावे. हा अभ्यास महाविद्यालयातील सर्वच विद्या शाखांना लाभ देऊन समाजशील उपक्रम राबविल्याचे सार्थक होईल असे हे अनोपचारिक शिक्षण आताच्या पिढीला देणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने विचार होणे आवश्यक असल्याचे प्रा. कुराडे यांनी सांगितले. यावेळी संस्था सचिव डॉ. अनिलराव कुराडे यांनीही आपल्या मार्गदर्शनातून शिवराज विद्या संकुल हे विद्यार्थी हिताचे आणि समाज हिताचे उपक्रम नेहमीच राबवीत आहे. त्याला विद्यापीठाचे वेळोवेळी पाठबळ मिळावे असी अपेक्षा व्यक्त करून समाजासाठी शिवराज विद्या संकुलाच्या माध्यमातून जे योगदान देता येईल त्यासाठी कट्टीबच्द असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी २१ व्या शतकातील आपत्ती व्यवस्थापन व उपाययोजना काळाची गरज' या संशोधनपर पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शक सत्यजित देसाई, जीवरक्षक दिनकर कांबळे, संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे, संचालिका सौ. बिनादेवी कुराडे,
प्रा के बी केसरकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे आपत्ती व्यवस्थापन जिल्हा समन्वयक श्री संजय पाटील, आपत्ती व्यवस्थापन नगर परिषदेचे श्री रविनंदन जाधव, डी, सरोज बिडकर, रजिस्ट्रार डॉ. संतोष शहापूरकर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व गडहिंगलज आपत्ती व्यवस्थापनचे पदाधिकारी यांच्यासह अन्य मान्यवर विविध महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी, विद्या संकुलातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन समन्वयक डी दीपक खेडकर, ही जी जी गायकवाड, डॉ. एस. डी. सावंत, प्रा. डी. बु. जाधव व अन्य प्राध्यापकांनी केले. सूत्रसंचालन डॉ. श्रद्धा पाटील यांनी केले तर आभार प्रा. गौरव पाटील यांनी मानले.