गडहिंग्लज : गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन
आणि टॅलेन्ट कन्सोल ग्लोबल (टीसीजी) फौंडेशनतर्फे शनिवार दि. २ मार्चपासून टीसीजी युनायटेड बेबी लिग स्पर्धेला प्रारंभ होत आहे. आठ, दहा आणि बारा वर्षाखालील या तीन गटात स्पर्धा होईल, दर शनिवारी आणि रविवारी सायंकाळच्या सत्रात दिनकरराव शिंदे विद्यालयाच्या मैदानावर ही स्पर्धा होईल, नवोदितांना प्रोत्साहन देणाऱ्या या स्पर्धेत अधिकाधिक संघांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन युनायटेडचे अध्यक्ष मलिकार्जुन बेल्लद, उपाध्यक्ष डॉ. रविंद्र हत्तरकी, टीसीजीचे अध्यक्ष वैभव गवस, उपाध्यक्ष संजय पाटील यांनी केले आहे. स्पर्धा समन्वयक हर्षल कुरळे, यश पाटील आणि सहकारी स्पर्धेचे नियोजन करीत आहेत.