हलकर्णी : मनवाड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गीता रेडेकर यांची निवड झाली. सरपंच ज्ञानप्रकाश रेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. उपसरपंच वैभवी लोखंडे यांनी राजीनामा दिल्यामुळे पद रिक्त झाले होते. यावेळी सदस्य नवलाप्पा कलगोंडा, पांडुरंग लोखंडे, वैभवी लोखंडे, शालन नावलगी, कमल कांबळे उपस्थित होते. ग्रामसेवक विजय जाधव यांनी सचिव म्हणून काम पाहिले. कर्मचारी ढुंडाप्पा पाटील यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.