गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन कार्यक्रम संपन्न झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस.एम.कदम होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. मनमोहन राजे यांनी केले. यावेळी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात प्रा. पौर्णिमा कुराडे यांनी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या साहित्याचा आढावा घेतला व मराठी भाषेचे महत्व सांगून 'गाभारा', 'कणा', 'क्रांतीचा जयजयकार' या कवितांचा आशय उलगडून सांगितला. यावेळी प्राचार्य डॉ. एस.एम. कदम यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये मराठी भाषेचे महत्व अधोरेखित केले. याप्रसंगी 'मराठी भाषेचे महत्व' या विषयावरील भित्तीपत्रकाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास डॉ. नंदकुमार कोल्हापुरे, डॉ. रंगराव हेंडगे, डॉ. आनंद कुंभार, डॉ. दीपक खेडकर, डॉ. संजय सावंत, डॉ.आण्णासाहेब हारदारे यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अशोक मोरमारे यांनी केले तर आभार डॉ. श्रद्धा पाटील यांनी मानले.