गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात इंग्रजी विभागाच्या वतीने 'संत शिरोमणी रविदास महाराजा यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम होते. प्रारंभी इग्रजी विभाग प्रमुख प्रा.डी.यु. जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संत रविदास यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांच्या हस्ते करण्यात आले
या कार्यक्रमात हिंदी विभाग प्रमुख डी.एन.बी. एकिले यांनी 'संत रविदास यांच्या जीवनकार्याबाबत मार्गदर्शन करताना-'संत शिरोमणी रविदास' यांची बेगमपुरा आदर्श समाजाची संकल्पना स्पष्ट केली. त्यांनी हिंदू-मुस्लीम बाच्यामध्ये समन्वय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातीभेद, अस्पृश्यता, रूढी परंपरा, अंधश्रद्धा यावर जोरदार प्रहार करून आधुनिक समाजाची स्थापना करण्याचा प्रयत्न केला, संत रविदास यांनी गुरुमुखी लिपी निर्माण केली, महिलांना सन्मान देण्याचे महान कार्यही त्यांनी केले. त्यांच्या कार्याचा आदर्श आजच्या नव्या पिढीने घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ.एन.बी.एकिले यांनी केले, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनीही अध्यक्षीय भाषणातून संत शिरोमणी रविदास' यांच्या कार्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ग्रंथपाल श्री संदीप कुराडे, प्रा. विशांत दानवडे, प्रा. सौ. प्राजक्ता बालेशगोळ यांच्यासह सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी. विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रा. सौ. पौर्णिमा कुराडे यांनी मानले.