ऋषीकेश जोंधळे यांच्या स्मारकाचे उद्या भूमिपूजन

KolhapurLive


उत्तर : बहिरेवाडी ( ता. आजरा) येथे शहीद वीर जवान ऋषीकेश रामचंद्र जोंधळे यांचे स्मारक व स्वागत कमानीचे भूमिपूजन माजी मंत्री व आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे. माजी सभापती वसंतराव धुरे अध्यक्षस्थानी आहेत. शनिवारी (ता .४) डॉ. जे. पी. नाईक  यांच्या स्मारकाशेजारी  हा कार्यक्रम होईल. सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता शामराव कुंभार, कार्यकारी अभियंता  प्रवीण जाधव, तहसीलदार विकास अहिर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य  काशिनाथ तेली, आजरा साखर कारखाना संचालक मारुती घोरपडे, माजी उपसभापती शिरीष देसाई, उपविभागीय अभियंता राजेंद्र सावंत, शाखा अभियंता सागर कुंभार, सुभेदार महादेव पवार, सरपंच रत्नजा सावंत, उपसरपंच दत्ता मिसाळ, सुरेश खोत आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थिति राहावे, असे आवाहन जोंधळे यांनी केले आहे‌.