कोवाड, ता. २ : राजगोळी खुर्द (ता. चंदगड ) येथील ओलम (हेमरस) साखर कारखान्याकडून चालू हंगामातील १ ते १५ फेब्रुवारीपर्यंत आलेल्या उसाची बिलं बँक खात्यावर जमा केल्याची माहिती बिझनेस हेड भरत कुंडल यांनी दिली.
बिलं प्रतिटन तीन हजार आठ रुपये प्रमाणे एकरकमी दिली आहेत. १५ फेब्रुवारीनंतर गाळप झालेल्या ऊसाची बिलं गळीत हंगामाच्या अखेरीला देण्याचे नियोजन केले आहे. वाहतूक व तोडणी मजुरांची बिलेही टप्प्याटप्प्याने दिली जात आहेत. दरवर्षी शेतकरी, तोडणी व वाहतूकदारांची बिले वेळेवर दिली जातात. त्याअनुषंंगाने यावर्षीही कारखाना प्रशासनाने बिलांचे नियोजन केल्याची माहिती कुंडल यांनी दिली.