चंदगड, ता. २ : किल्ले पारगड (ता. चंदगड ) येथील ग्रामस्थांनी नळपाणी योजनेसाठी बेमुदत उपोषण आंदोलनाचे हत्यार उपसल्यानंतर प्रशासन नमले. मिरवेल हद्दीतून योजना राबवावी ही त्यांची मागणी मान्य करताना अवघ्या चोविस तासात जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ८० लाख ५६ हजार ९०६ रुपयांच्या निविदेस मंजुरी दिली. पुढील नऊ महिन्यांत ठेकेदाराने हे काम पूर्ण करण्याचे आदेशात म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव पाटील यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. लक्ष्मण गावडे यांच्या हस्ते आंदोलकांना लिंबू पाणी देऊन उपोषण मागे घेतले.
आंदोलनासाठी बसलेले रघुवीर शेलार, सरपंच संतोष पवार, सुरेश मालुसरे , संदीप कांबळे, जयालक्ष्मी मालुसरे, कल्पना घोरपडे, सावित्री कांबळे, दीपक माळी, प्रकाश झेंडे आदींना लिंबूपाणी देऊन उपोषण सोडले.