हेरेत निरंकारी स्वयंसेवकाची स्वच्छता

KolhapurLive

चंदगड : हेरे (ता. चंदगड) येथे संत निरंकारी मंडळाच्या स्वयंसेवकांनी जॅकवेल परिसराची स्वच्छता केली. दैनदिन व्यवहारात पाणी घटक महत्त्वाचे आहे. स्वच्छ पाणी उत्तम आरोग्यसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे जिथून गावाला पाण्याचा पुरवठा होतो,तो परिसर स्वच्छ असावा हा हेतू ठेवून हा उपक्रम राबवण्यात आला.
         मधुकर शिंदे,नारायण पवार यांनी निरंकारी मिशनच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. जात, धर्म, पंथ यापलीकडे जाऊन माणुसकी हाच खरा धर्म हे निरंकारी पंथाचे तत्व आहे. त्याचा तत्वाने या पंथात कार्यरत असणारे स्वयंसेवक मार्गक्रमण करणार असतात. दरवर्षी सातत्याने  सत्संगाच्या माध्यमातून समाजात चांगल्या गुणाची पेरणी करीत असताना प्रत्यक्ष कामातूनही मार्गदर्शन केले जाते. सार्वजनिक ठिकाणांचे स्वच्छता, समुदायिक विवाह सोहळा आयोजन केले जातात. दरम्यान स्वयंसेवकानी फावडे आणि झाडू घेऊन परिसराची स्वच्छता केली. सरपंच जयश्री गावडे, उपसरपंच विशाल बल्लाळ, आप्पाजी गावडे, यांनी सहभाग घेतला. सुरेश धुळप यांनी आभार मानले.