आजरा : श्रृंगारवाडी, उचंगी या प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना डिजिटल पाटीचे वाटप करण्यात आले. श्रृंगारवाडी उचंगी ग्रुप ग्रामपंचायतीतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. मुलांना शिक्षणाविषयी आवड वाढावी, अभ्यासामध्ये गोडी निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांना अंकगणित, चित्रे, अभ्यास करणे सोपे व्हावे, यासाठी ग्रामपंचायतीने आणखी एक पाऊल उचलले आहे, असे सरपंच समीर देसाई व ग्रामसेवक मुरलीधर कुंभार यांनी सांगितले. गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे, सहायक गटविकास अधिकारी अविनाश पाटील व मान्यवरांच्या हस्ते डिजिटल पाटीचे वाटप झाले. उपसरपंच राजेश देसाई, जयश्री कळेकर, विमल पाटील, संगीता कांबळे, अंकुश तारळेकर, सीमा देसाई, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शामराव हरेर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भीमराव पाटील उपस्थित होते.