चंदगड येथील सातेरीदेवी दूध संस्थेची निवडणूक बिनविरोध

KolhapurLive


चंदगड, ता.१३ : मजरे शिरगाव (ता. चंदगड) येथील श्री सातेरीदेवी महिला सहकारी दूध संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. निकिता मुळीक, सुरेशा,  फाटक, शारदा मुळीक, वर्षा मुळीक, लक्ष्मी कंग्राळकर, जयश्री वाके, लता सूर्यवंशी, आशा सुंडकर  यांचा संचालक मंडळात समावेश झाला. गुरव यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. संस्थापक अंकुश मुळीक, सचिव पुंडलिक मुळीक, नारायण भोगण, दिलीप सुंडकर,  कृष्णा सूर्यवंशी, बाळू वाके यांच्यासह सभासद उपस्थित होते.