गडहिंग्लज, ता. १३ : येथील डॉ. घाळी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या घरगुती उपयोगाच्या वस्तूंचे प्रदर्शन झाले. वाणिज्य विभागाच्याा विद्यार्थीनी या वस्तू तयार केल्या होत्या. प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. संस्थेचे सहसचिव गजेंद्र बंदी, यांनी स्टॉलना भेट दिली. डॉ. एम. डी. पुजारी, प्रा. एस. एन. जानवेकर, प्रा. पूजा पाटील, प्रा. पी. पी. पुजारी , प्रा आर.आर. म्हांकवे, यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. दिशा गुंजाटे हिने स्वागत केले. गुरुराज पाटील याने आभार मानले.