गडहिंग्लज, ता. १० : भडगावच्या डॉ. ए. डी. शिंदे इंजिनिअरिंग महाविद्यालयात बुधवारी (ता. १५) विविध कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन केले आहे. टेक्निकल व नॉन टेक्निकल पदासाठी लेखी, तोंडी व मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. या कॅम्पसमधून सुमारे एक हजार नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये डिस्टील, वायएसएफ, तांबवे ग्रुप, मारुती ग्लास, एडीको, एसकेएसपीएल आदी कंपन्यांमध्ये ग्रामीण विभागातील गरजू, होतकरू तसेच कौशल्याधिष्ठित तरुणांना नोकरी उपलब्ध होणार
आहे. गडहिंग्लज, आजरा, चंदगड, गारगोटी, कागल व सीमावर्ती भागातील आयटीआय, डिप्लोमा, बीई, बीटेकसह बीबीए, बीसीए, बीए, बीकॉम, दहावी- बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना अकुशल उमेदवारीतून संधी उपलब्ध होणार आहे. पुणे, कोल्हापूर व इतर ठिकाणी या कंपन्यांच्या अस्थापना कार्यरत असून निवड झालेल्यांना अनुभव, पात्रतेनुसार १५ ते २५ हजारांपर्यंत वेतन मिळणार आहे. प्राचार्य किशोर जोशी, साजीद सोलापुरे यांनी नियोजन केले आहे. विभागातील अधिकाधिक गरजूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थाध्यक्ष श्रीपतराव शिंदे, सचिव प्रा. स्वाती कोरी यांनी केले आहे.