साई बी. एड. चा शंभर टक्के निकाल

KolhapurLive

गडहिंग्लज : गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील साई स्पेशल बी.एड. (एचआय) कॉलेजचा शंभर टक्के निकाल लागला. २०१९-२० मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे डिसेंबर २०२२ ला परीक्षा घेतली होती. महाविद्यालयात • गुणानुक्रमे अमोल स्वामी (८०.२०), छाया कांबळे (७८.९५) व वंदना क्षीरसागर (७८.४५) यांनी यश मिळवले. यशस्वी विद्यार्थ्यांना केंद्र संयोजक प्रा. तानाजी गायकवाड, श्रीमती रुपाली तेली, प्रा. टिकेश कुमार, प्रा. सुरजित सिंग यांचे मार्गदर्शन मिळाले. संस्थाध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब घुगरे यांचे प्रोत्साहन मिळाले.