उत्तूर - गवसे रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी

KolhapurLive

उत्तुर , गवसे ते उत्तुर या रस्त्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या उतूर शाखेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाअध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांच्याकडे निवेदनद्वारे केली.
          निवेदनात म्हटले आहे, या रस्त्याचे रुंदीकरण झाल्यास गोवा व कोकणाकडे जाणारे पर्यटक यांची संख्या वाढणार आहे.हा रस्ता  आंबेओहळ व सर्फनाला  प्रकल्पांना लागून आहे. आजरा साखर कारखान्याचे वाहतूक अंतर कमी होईल. मेस काठी वाहतुक सोयीस्कर होईल. या परिसरातील दुर्गम भागाचा विकास होईल. उतूर गावचा व विभागाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी या रस्त्याचे रुंदीकरण गरजेचे आहे. निवेदनावर भास्कर भाईगडे, मंदार हळवणकर, बाळासाहेब सावंत, प्रदीप लोकरे, धोंडीराम सावंत यांची नावे आहेत.