चंदगड : येथून इनाम सावर्डे गावाला जोडणारा पाणंद रस्ता खुला करण्यात आला. महसूल खात्याच्या मदतीने हे काम करण्यात आले. अनेक वर्ष हा रस्ता बंद होता. शेतकऱ्यांना शेताकडे जाताना फेरा मारून जावे लागत होते. शेती औजारे, खते, बी -बियाणे ने-आण करताना त्रास होते होता. मजरे शिरगाव ग्रामपंचायतीच्या सहकार्याने मंडल अधिकारी अमर पाटील, राजश्रीचे पचंडी, शिरगावचे तलाठी, पोलिसपाटील, सरपंच व इतर पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. त्यानंतर ही पाणंद खुली करण्यांत आली. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूराव हळदणकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.