आजरा, ता. १५ उत्तूर-गारगोटी रस्त्यालगत वणवा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करणारी भावंडे गिरीश कुंभार व विक्रम कुंभार यांची दुचाकी आगीत खाक झाली. रवळनाथ को- ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीने दहा हजार रु., संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी पाच हजार रु. मदत दिली. नवकृष्णा व्हॅली संस्थेजवळ तुषार घोरपडेच्या पॉली हाऊसजवळील गवताला आग लागली. दरम्यान आजऱ्यातून पिंपळगावला दुचाकीने निघालेल्या गिरीश कुंभार व
विक्रम कुंभार हे आग आटोक्यात आणण्यासाठी धावले. दुर्देवाने त्यांची रस्त्याकडेची मोटारसायकल वणव्यात जळून खाक झाली. याबाबतचे वृत्त वाचल्यानंतर रवळनाथ हौसिंगचे संस्थापक अध्यक्ष श्री. चौगुले यांनी त्यांना संस्थेतर्फे व वैयक्तीक मदत दिली. आजरा शाखाध्यक्ष प्रा. डॉ. विनायक आजगेकर यांच्या हस्ते विक्रम कुंभार यांना धनादेश दिला. यावेळी उपाध्यक्ष प्रा. व्ही. के. मायदेव, संचालक प्रा. डॉ. किरण पोतदार, शाखाधिकारी बसवराज चौगुले व कर्मचारी उपस्थित होते.