राजा शिवछत्रपती महाविद्यालयात शिवराज अग्रणी महाविद्यालय योजनेंतर्गत 'ई-गव्हर्नस' व 'डिजिटल इंडिया' विषयावर एकदिवसीय कार्यशाळेत बोलत होते. कार्यक्रमास संस्था सचिव बी. ए. पाटील यांची उपस्थिती होती. उद्घाटन प्राचार्य डॉ. जाधव यांच्या हस्ते रोपाला जलार्पण करून केले. प्रथम सत्रात
शिवराज महाविद्यालयातील संगणक विभागप्रमुख प्रा. अमित कुलकर्णी यांनी भारतातील डिजिटल इंडियाचा वाढता प्रसार याविषयी मार्गदर्शन केले. द्वितीय सत्रात प्रा. डॉ. वैजनाथ सूर्यवंशी यांनी जनता आणि शिक्षण व्यवस्थेत डिजिटल स्वरूप कसे वाढत आहे. याविषयी मार्गदर्शन केले. कार्यशाळेस गडहिंग्लज, आजरा, चंदगडमधील वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यशाळेस संस्थाध्यक्ष बाळासाहेब कुपेकर यांची प्रेरणा लाभली. प्रा. मानाजीराव शिंदे, प्रा. दिलीप काळे, प्रा. डॉ. केशव देशमुख, प्रा. रचना मुसाई, प्रा. एन. आर. पाटील उपस्थित होते.