गडहिंग्लज, ता. १६ : भडगाव येथील डॉ. ए. डी. शिंदे ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये झालेल्या कॅम्पस इंटरव्यूहमध्ये १८२ उमेदवारांना रोजगार मिळाला. यासाठी ३५० हून अधिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती.
कॅम्पसचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी केले. संस्थेच्या सचिव स्वाती कोरी यांनी मार्गदर्शन केले. विविध कंपन्यांच्या समूहचे एच. आर. व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांचे स्वागत श्री. शिंदे, सौ. कोरी व प्राचार्य किशोर जोशी यांच्याहस्ते झाले. ४७ जणांना एसकेएसपीएल, १२ मिराशी, १८ रेमंड, ४२ डिस्टीज, ४ एडीको आणि ५९ जणांना तांबवे अशा कंपन्यामध्ये निवड केली. निवड झालेल्यांमध्ये डॉ. ए. डी. शिंदे डिप्लोमा कॉलेजच्या १८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. टीपीओ साजिद सोलापुरे, मुख्य समन्वयक महादेव बंदी यांनी कॅम्पस इंटरव्यूहचे नियोजन केले. डिप्लोमाचे प्राचार्य ए. एस. शेळके उपस्थित होते. पूजा शिरगावी यांनी सूत्रसंचालन केले.