उत्तूरला उद्या ऊस उत्पादकांचा मेळावा

KolhapurLive

उत्तूर : येथे आजरा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे ऊस उत्पादक वाढीसाठी बुधवारी (ता. १५) धुरे मंगल कार्यालयात मार्गदर्शन मेळावा होणार आहे. हेक्टरी १२५ टन ऊस उत्पादकता वाढ अभियान अंतर्गत हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये शेतकरी प्रक्षेत्र भेट, सहल व मार्गदर्शन कार्यक्रम होईल. या वेळी ऊस तज्ज्ञ अंकुश चोरमोले, कीटक शास्त्रज्ञ डॉ. अभयकुमार बागडी मार्गदर्शन करणार आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन कृषी अधिकारी यांनी केले आहे.