गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. संजय राऊतांनी आधी विधिमंडळातील शिंदे गटाच्या आमदारांचा ‘चोरमंडळ’ असा उल्लेख केल्यामुळे त्यावरून टीका सुरू झाली होती. त्यानंतर आता त्यांनी निवडणूक आयोगावर टीका-टिप्पणी केल्यामुळे त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी राऊतांच्या वक्तव्याचं समर्थन केलं असलं, तरी सत्ताधाऱ्यांनी यावरून राऊतांना घेरायला सुरुवात केली आहे. कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना संजय राऊतांना सूचक इशाराच दिला आहे.
नेमका वाद काय?
संजय राऊतांनी शिंदे गटाच्या आमदारांचा उल्लेख चोरमंडळ असा केल्यामुळे हा विधिमंडळाचा अपमान असल्याचा दावा करत त्यांच्याविरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव आणण्यात आला. यावर निर्णय घेण्यासाठी हक्कभंग समितीही नेमण्यात आली आहे. एकीकडे या घडामोडी घडत असताना शिवगर्जना यात्रेच्या निमित्ताने संजय राऊतांनी निवडणूक आयोगाला असणारा विरोध अधिक तीव्र केला आहे. त्यावरून सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलताना मंत्री अब्दुल सत्तार यांनी राऊतांवर तोंडसुख घेतलं आहे.

“हे सगळं साम्राज्य उद्ध्वस्त झालं त्याचं मूळ कारणचं संजय राऊत आहेत. त्यांनी राजकीय समीकरणं कुठे जोडायचे? कसे जोडायचे? काय बोलायचं? कुठे बोलायचं? कसं बोलायचं? बोलायचे परिणाम काय? याची जाणीव न ठेवता ते बोलतात. हे चुकीचं आहे. राज्यात विधानसभा-परिषदेचा सन्मान करायला हवा”, असं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.
“ते आमच्या मतांवरच राज्यसभेचे खासदार म्हणून गेले आहेत. आमच्या मतांमुळेच त्यांना राज्यसभेत काम करण्याची संधी मिळाली. अशा माणसाने अशा पद्धतीचं वक्तव्य करणं चुकीचं आहे. त्यांना वाटतंय आपण राज्यसभेवर आहोत म्हणून दुसऱ्याला काहीही बोलू शकतो. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील”, असं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.
दरम्यान, कसब्यात झालेल्या पराभवावर मंथन केलं जाईल, असं सत्तार यावेळी म्हणाले. “पुण्यात एका ठिकाणी आम्ही जिंकलो, दुसऱ्या ठिकाणच्या पराभवाचं चिंतन करणं आवश्यक आहे. पराभवाची कारणं शोधून भविष्यात असं काही होणार नाही याची दक्षता घेतली जाईल”, असं अब्दुल सत्तार म्हणाले.