(संग्रहित छायाचित)
महागाव, ता. १५ : गडहिंग्लज-चंदगड राज्य मार्गावर महागावच्या हद्दीत रस्त्याकडेला असणारे झाड धावत्या दुचाकीवर कोसळल्याने मलीग्रे (ता.आजरा) येथील अशोक बुगडे व सुरेखा बुगडे हे दांपत्य जखमी झाले .
महागाव येथील पाच रस्तापासुन ते डीएड कॉलेज दरम्यानच्या रस्त्यावरून गडहिंग्लजकडे दुचाकीवरून सदर दांपत्य कामानिमित्त जात होते. याच दरम्यान या मार्गावर जाधव यांच्या शेतानजीक रस्त्याकडेला जीर्ण झालेले झाड अचानक कोसळले. हे झाड दुचाकीवरून जात असलेल्या दांपत्यावरच कोसळल्याने ते जखमी झाले.