शेतकऱ्यांच्या वेदनेवरील 'दौलत' लघु चित्रपट २२ रोजी प्रदर्शित

KolhapurLive

चंदगड - देशातील शेतकऱ्यांच्या कच्च्या मालावर चालणारे उद्योग व्यवसाय टिकले तर शेतकरी जगेल शेतकरी जगला तर सारा देश जगेल... ही संकल्पना घेऊन इ. म्हाळूगेचे गोपाळ कानूरकर यांनी दौलत या लघु चित्रपटाची निर्मिती केली आहे. या लघुचित्रपट प्रदर्शन होणार आहे.
    
         चंदगड तालुक्यातील हजारो शेतकरी,कामगार, वाहतूकदार आणि हलकर्णी बाजारपेठ वर्ग यांची दौलत साखर कारखाना बंद पाडल्याने जी हानी झाली आणि त्याच्यावर  कसा दुःखाचा डोंगर कोसळला, याचे उतरण या लघुपटात करण्यात आला आहे. या लघु चित्रपटाला राहुल कडते, युवराज शिंदे, संजय मुळीक ,सागर गावडे विठोबा गावडे व सदाशिव चौगुले यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. त्या लघुपट येत्या 22 फेब्रुवारी रोजी आम्ही चंदगडी फिल्म वर प्रदर्शित होत आहे.यामध्ये भारत भोसले, परशुराम पारधी, आत्माराम पाटील, नागराज पाच्चे ,तुषार पाटील, वैशाली पाटील, मानसी मंगोरे, आरती मोरे यांनी भूमिका केलेल्या आहेत. या लघुपट साऱ्यांनी पहावा असे आव्हान केले आहे.