गोगटे - वाळके कॉलेज बांदा येथे २ मार्च रोजी खुली एकपात्री अभियान स्पर्धा

KolhapurLive


हलकर्णी : येथे श्रीमती चंद्राबाई कल्लाप्पा म्हेत्री मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट हलकर्णी तालुका गडहिंग्लज, कोल्हापूर आणि शिक्षण प्रसारक मंडळ बांदा संचालित गोगटे वळके कॉलेज बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या पातळीवर एकपात्री अभिनय स्पर्धा गुरुवार दिनांक २ मार्च २०२३ रोजी सकाळी ९ वाजता गोगटे वाळके महाविद्यालय बांदा, जिल्हा सिंधुदुर्ग येथील महाविद्यालयाच्या संस्कृतीक सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. सदर स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक पारितोषक पाच हजार रुपये आणि आकर्षक प्रशस्तीपत्र कै. चंद्राबाई कल्लाप्पा म्हेत्री यांच्या स्मरणात प्राचार्य डॉक्टर किशोर कल्लाप्पा म्हेत्री यांनी हे पारितोषिक पुरस्कृत केले आहे. द्वितीय क्रमांकासाठी तीन हजार रुपये व आकर्षक प्रशस्तिपत्र कै . शालन उर्फ ताई आनंदा शिर्के यांच्या  स्मरणात प्रा. अनिल शिर्के   यांनी हे पारितोषिक पुरस्कृत केले आहे . तृतीय क्रमांकासाठी पंधराशे रुपये व आकर्षक प्रशस्तीपत्र कै. यशोदाबाई  सिताराम  गावडे  यांच्या स्मरणात प्रा.  रमाकांत सिताराम गावडे यांनी हे पारीतोषिक पुरस्कार केला आहे, तर उत्तेजनार्थ पारितोषिक १००० रुपये आकर्षक प्रशस्तीपत्र कै.चंद्रकांत कांबळे यांच्या  स्मरणात  श्री. मुकुंद चंद्रकांत कांबळे यांनी पुरस्कृत केला आहे. सांस्कृतिक आदान प्रदानता व्हावी, बुजुर्ग कलावंत ते नवोदित कलावंतांना हक्काचा रंगमंच  उपलब्ध व्हावा " या उद्देशाने या दोन्ही संस्थांनी संयुक्तपणे  या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत वय वर्ष १० नंतरची कोणतीहि व्यक्ती सहभागी होऊ शकते. किमान सात मिनिटे व कमाल  दहा मिनिटापर्यंत एक  सादरीकरण करता येईल. ही स्पर्धा  मराठी भाषेत होईल. प्रत्येक स्पर्धकाला प्रवेश फी शंभर रुपये असेल या स्पर्धेबाबत इतर नियम व अटी स्पर्धेच्यावेळी सांगण्यात येतील  या  क्षेत्राातील तज्ज्ञ  व्यक्तिंच्यावतीने या स्पर्धेच परीक्षण होणार असून तरी जास्तीत जास्त कलावंतानी या  स्पर्धेत सहभाग घेऊन  ही स्पर्धा यशस्वी करावी तसेच या स्पर्धेबाबत अधिक माहिती करीता संयोजन समितीचे  प्रा. आर. एस. गावडे (मोबाईल ९१४५५६२९७९), प्रा. अनिल शिर्के (मोबाईलच्या ९४२३८१५०९६) यांच्याशी संपर्क  साधावा  असे आव्हान  प्राचार्या डॉ. गोविंद काजरेकर  व श्रीमती  चंद्राबाई म्हेत्री ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. डॉ. किशोर कल्लाप्पा म्हेत्री यांनी केले  आहे.