चंदगडच्या विभागप्रमुखांना कायद्याचे ट्रेनिंग द्यावे

KolhapurLive



चंदगड : चंदगड तहसीलदार , गटविकास अधिकारी यांच्यासह विभागप्रमुखांना कायद्याचे पुन्हा एकदा ट्रेनिंग द्यावे, अशी मागणी ब्लॅक पॅंथर पक्षाचे अध्यक्ष सुभाष देसाई, पश्चिम महाराष्ट्र महिला निरीक्षक छायाताई देशमुख यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली आहे.

चंदगड तालुक्यात गेल्या काही महिन्यापासून प्रशासन सुस्त झाले आहे. सर्वसामान्यांची कामे होत नाहीत. लोकांना सारख्याच फेऱ्या माराव्या लागत आहेत. गरजूंना न्याय मिळत नसल्याच मत सुभाष देसाई यांनी मांडले आहे. सर्वच शासकीय क्षेत्रात लोकांना वेठीस धरण्याचे काम केले जात असून जर सर्वसामान्यांची दखल घेतली जाति नसेलही तर सर्वसामान्यांनी दाद मागायची कुठ? अहा सवाल  ब्लॅंक पॅंथर व नागरीकांकडून केला जात आहे. चंदगड तहसीलदार, गटनिकास अधिकारी  यांच्यासह विभागप्रमुखांना कायद्याचे पुन्हा एकदा ट्रेनिंग द्या  अथवा त्यांना कायदे कळूनही जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्यास त्यांच्यावर कारवाई करून अकार्यक्षम म्हणून बदल्या  करण्याबाबतचे निवेदन पालकमंत्री दीपक केसरकर यांना देण्यात आले आहे.