महागाव उरुसानिमित्त विविध कार्यक्रम

KolhapurLive
    महागाव, ता. २० : येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला येथील अवलिया गबिवली देवाचा उरूस २२ ते २४ दरम्यान होत. आहे त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम व स्पर्धाचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त बुधवारी ( ता. २३ ) दस्तगीर सोलापूरे यांच्या घरातून संदल ( गंध ) मिरवणूक, गुरुवारी ( ता.२४) भर उरूस, बाळासाहेब मगदूम यांच्या घरातून देवाचा पहिला नैवेद, शुक्रवारी ( ता. २५ ) भाऊसाहेब कांबळे यांच्या घरातून गलेफ व विठ्ठल चौगुले यांच्या घरातून झेंडा मिरवणूक असणार आहे.

        गुरुवारी ( ता. २४ ) विविध स्पर्धा होणार आहेत. १७ वर्षाखालील मुली व मुले धावणे, ओपन सायकल स्पर्धा, हातात कासरा धरून बैल पळवणे, जनरल घोडा - गाडी, एक पाडा व एक बैलगाडी, जनरल बैलगाडी शर्यत, महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानावर मेंढा टकरी स्पर्धेत आयोजन केले आहे. कार्यक्रम व स्पर्धांसाठी उपस्थितीत राहण्याचे आवाहन फिरोज सोलापूरे  ,श्रीकांत मांगले व  अशपाक मुरसल  यांनी केले आहे ‌.
‌‌‌               
‌‌‌‌‌