क्रिएटिव्ह हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ

KolhapurLive

गडहिंग्लज : येथील इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह एज्युकेशन संचलित क्रिएटिव्ह हायस्कूलमधील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ घेण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर देसाई होते. स्वागत मुख्याध्यापक दिनकर रायकर यांनी केले. यावेळी तनिक्षा पाटील, तन्वी सावंत, सायली कोकितकर, वरदा  पाटणे, अंजली गाडे,  सुजित जगताप, रोहिणी शिंदे यांनी मनोगते व्यक्त केली. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. सुभाष पाटील, सचिव अण्णासाहेब बेळगुद्री यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगत डॉ. देसाई यांनी  केले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.  सूत्रसंचालन एस. आर. पारथे  यांनी केले, तर आभार शोभा कलकुटगी यांनी मानले.