पत्रकार वारिशे यांच्यावर हल्ला करणाऱ्यावर कारवाई करा

KolhapurLive

गडहिंग्लज : रत्नागिरी येथेल पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्या करणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी गडहिंग्लज येथेल वृत्तपत्र विक्रेत्यांनी केली आहे .महादेव अडसुळे नामदेव लुंगडे, सुरेश खोत, बाळू हेब्बाळे विजय देवन्नावर अजित स्वामी ,अण्णासाहेब नेवडे ,दत्ता घुगरे रमेश कोकितकर, बंडा केसरकर ,काशिनाथ गडकरी आदीनी मागणी केली आहे. हल्लेखोराचा निषेध करीत वारिशे यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.