गडहिंग्लज:स्वच्छ भारत अभियान अंतर्गत एक राष्ट्रीय उपक्रम म्हणून शहरातील जागृती हायस्कूलच्या १५८ विद्यार्थिनी श्री काळभैरी मंदिर परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवली.एक राष्ट्रीय उपक्रम आणि सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन प्रशालेच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.नुकतीच काळभैरी यात्रा पार पडली होती. या यात्रेला लाखो भाविकांनी दर्शनासाठी उपस्थिती दर्शवली होती. या यात्रेमुळे मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साठल्याने अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले होते.याची स्वच्छता विद्यार्थ्यांनी केली आहे .सुरेश गुरव यांनी विद्यार्थ्यांना खाऊ देऊन उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. मुख्याध्यापक विजयकुमार चौगुले यांनी यांचे प्रोत्साहन लाभले.ही मोहीम यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षण संपत सावंत, प्रवीण पाटील ,प्रकाश गायकवाड सविता कामनुरी यांनी विशेष परिश्रम घेतले.