गडहिंग्लज अभिषेक पोवारचे खेलो इंडियात सार्वाधिक गोल

KolhapurLive

     गडहिंग्लज, ता.१३ : येथील गडहिंग्लज युनायटेडचा युवा प्रतिभावान खेळाडू अभिषेक शंकर पोवारने खेलो इंडिया राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत सार्वाधिक गोल नोंदवण्याचा पराक्रम केला आहे. त्याने स्पर्धेत पाच गोल मारले. त्याच्या चौफेर पाच खेळामुळे त्याच्या संघाने उपविजेतेपदापर्यंत भरारी मारली. तो कर्नाटकाकडून खेळत आहे. मध्य प्रदेश मध्ये ही स्पर्धा झाली.

     अठरा वर्षीय अभिषेक हा मध्य मध्यफळीतील उत्कृष्ट खेळाडू आहे. अभिषेक पोवाराच्या दोन गोलच्या जोरावर पहिल्या सामन्यात बलाढ्य बंगालला ३ - २ असे नमवले. दुसऱ्या सामन्यात ओरिसाला ३ - १ असे हरवून यात एक गोल मारला. तिसऱ्या सामन्यात तुळ्यबळ मेघालयाविरुद्ध त्याने एक गोल मारला; पण संघाचा २-१ असा पराभव टाळू शकला नाही. उपांत्य फेरीच्या चुरशीच्या सामन्यात पंजाबाविरुद्ध २-२ अशी बरोबरी असताना निर्णायक गोल करून कर्नाटकला ३-२ असा रोमहर्षक विजय मिळवत अंतिम फेरीत पोहोचवले. अंतिम सामन्यात कर्नाटकाचा दोन गोलनी पराभव झाल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याला खेळू इंडियनच्या शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे.
        गेल्या महिन्यात दिल्ली येथे झालेल्या संतोष ट्रॉफी पात्रता स्पर्धेतही गुजरात, त्रिपुरा, लडाख विरूद्ध चार गोल नोंदवून कर्नाटकला मुख्य फेरीत नेण्यात मोलाची कामगिरी केली आहे. तो मूळचा गुलबर्गाचा असून बालपणापासून युनायटेड फुटबॉल स्कूलमध्ये त्याने प्रशिक्षण घेतले.
     त्याला प्रशिक्षण दीपक कुपत्रावर यांचे मार्गदर्शन मिळाले.युनायटेडचे अध्यक्ष मल्लिकार्जुन बेल्लद आणि संचालक मंडळाचे प्रोत्साहन मिळाले.