चंदगड: कुरणे येथेल श्री रवळनाथ देवालयाची वार्षिक यात्रा बुधवारी दि.१५ फेब्रुवारी रोजी असून यात्रेनिमित्त गुरुवारी दि. १६ रोजी सायंकाळी ५ वाजता भव्य जंगी निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते . मोतीबाग तालीमचे पै. कुमार पाटील आणि पै. कीर्तीकुमार बेनके यांच्यात मुख्य लढत असून अन्य २५ कुस्त्या होणार आहेत. कुस्त्याचे उद्घाटन आमदार राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. मार्गदर्शन म्हणून महाराष्ट्रा केसरी पैलवान विष्णुपंत जोशीलकर तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री भरमू पाटील,दौलतचे माजी चेअरमन गोपाळराव पाटील, आप्पी पाटील, संग्रामसिं कुपेकर हे उपस्थित राहणार आहेत. यात्रेचा आणि कुस्त्यांचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आव्हान रवळनाथ देवस्थान कमिटीने केले आहे.