अडकूरला विविध विकासकामांचा प्रारंभ

KolhapurLive

चंदगड : येथे गटर व‌ रस्ता कॉंक्रिटीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. माजी सभापती बबन देसाई, गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीची माजी प्रशासकिय अध्यक्ष अभय देसाई, सरपंच सचिन गुरव, उपसरपंच उज्वला देसाई, आदींच्या उपस्थितीत कामाला सुरुवात झाली. बनन देसाई म्हणाले, की केंद्रातच व राज्यात आपल्या पक्षाची सत्ता असल्याने निधीची कमतरता पडणार नाही. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सदस्य शिवाजीराव पाटील, माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांच्या माध्यमातून विकासकामे राबवूया.अभय देसाई म्हणाले, की आमदार राजेश पाटील यांनी अडकूरच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. यापुढेही त्यांचे सहकार्य राहील. गावात कुरघोडीचे राजकारण करण्याऐवजी विकासासाठी एकत्र येऊया. ग्रामपंचायत सदस्य अभिजीत देसाई, शिवराज देसाई, सागर इंगवले, सुलोचना घोळसे, प्रतीक्षा कांबळे, दीपा भेकणे,  सुषमा कोट, अल्ताफ  चिंचणीकर, ग्रामसेवक दीपक घाटगे, शिरीन शेख , पुनम दड्डीकर, तानाजी कांबळे, तानाजी आंबीटकर आदी उपस्थित होते.