ट्रॅक्टरच्या धडकेत दूचाकीस्वार ठार

KolhapurLive
चंदगड : बेळगाव- वेंगुर्ला मार्गावर भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार गंगाराम यल्लाप्पा पाटील (वय ३०, रा. नरेवाडी, ता. चंदगड) ठार झाले. आज सकाळी दोनच्या सुमारास ही दुर्घटना घडली.  मृत पाटील हे माडवळे (ता. चंदगड) येथून दुचाकीने (एम एच ०९ बिक्यू ९५३७) गावाकडे येत होते. मजरे- कर्वेनजीक भरधाव ट्रॅक्टरने (एम एच ०९ एएल ८३४८) त्यांना जोराची धडक दिली.यात ते जागीच ठार झाले. दुचाकीचेही मोठे नुकसान झाले. याप्रकरणी पाटील यांचे भाऊ जनाबा यल्लाप्पा पाटील यांनी येथील पोलिसात फर्याद दिली. अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.हेड कॉन्स्टेबल जाधव अधिक तपास करीत आहेत.