गडहिंग्लज : माद्याळ कसबा नूल ( ता. गडहिंग्लज ) येथे जलजीवन मिशन योजनेतंर्गत मंजूर झालेल्या नळ पाणी योजनेचे उद्घाटन शुक्रवारी (ता. २४ ) होत आहे. सुरगीश्वर मठाचे गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींच्या सानिध्यात सोमलिंग देवालयाच्या आवारात सकाळी दहाला हा कार्यक्रम होईल.आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून अध्यक्षस्थानी आमदार राजेश पाटील असतील. खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, गटविकास अधिकारी शरद मगर, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता वैजनाथ कराड प्रमुख पाहुणे आहेत.कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे अवाहन राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष आण्णासाहेब देवगोंडा-पाटील, सरपंच शिवाजी गवळी, उपसरपंच राजेंद्र बोरगली, गटनेते रवींद्र घेज्जी यांनी केले आहे .