निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाचे सर्वोच्च न्यायालयात याचिका; शिंदे गटाकडून कॅव्हेट दाखल

KolhapurLive
आमदारांना अपात्र ठरवण्याच्या विधानसभाध्यक्षांच्या अधिकारांवरील नबाम रेबिया निकालाच्या फेरविचारासाठी ७ सदस्यांचे घटनापीठ स्थापन करण्याबाबतची मागणी ठाकरे गटाने केली होती. ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. दरम्यान, आता आमदारांच्या अपात्रतेबाबात आजापासून सलग तीन दिवस सुनावणी होणार आहे. याशिवाय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला आहे. याविरोधातही सोमवारी उद्धव ठाकरे यांच्यावतीने याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवरही आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला आहे. याविरोधातही सोमवारी उद्धव ठाकरे यांच्यावतीने याचिका दाखल करण्यात आली. विशेष म्हणजे त्यापूर्वीच शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केला आहे.