आजरा कारखान्याला ऊस पाठवावा

KolhapurLive

आजरा ,ता.: गडहिंग्लज उपविभागात आजरा हा एकमेव साखर कारखाना सहकारी तत्त्वावर सुरू आहे. तो टिकवण्यासाठी सभासदांसह सर्वांनी योगदान दिले असून पुढेही द्यावे.शेतकऱ्यांनी आपला ऊस बाहेर न पाठवता आजरा कारखान्याला पाठवावा, असे आव्हान कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे यांनी पत्रकार परिषदेत केली. शेतकऱ्याच्या खात्यावर वेळेवर बिल आदा करत असल्याचेही सांगितले.
          ते म्हणाले, दोन वर्षांपूर्वी आर्थिक अडचणीमुळे आजरा कारखाना बंद होता. हा कारखाना सहकारात पूर्ववत सुरू करण्यासाठी मोठा धडपद  करावी लागली. सभासद, शेतकऱ्यांच्या मालकीचा कारखाना पुन्हा सहकारात सुरू झाला. हा कारखाना कर्जमुक्त करण्यासाठी संचालक, प्रशासनाकडून धडपड सुरू आहे, सभासद व शेतकऱ्यांनीही यासाठी सहकार्य करावे. ऊस बिले वेळेत देत आहे. वजन काटा चोख आहे.दिवसाला ३५०० मॅट्रिक टन गाळप सुरू आहे. यंदा चार लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. यामुळे कारखाना आर्थिक आरिष्ठातून बाहेर पडण्यासाठी संधी आहे.
          तालुक्यात ५ हजार २०० हेक्टर ऊस पिकाखाली क्षेत्र आहे. त्यामुळे ३ लाख टन ऊस उपलब्ध होणार आहे. कारखान्याने २ लाख टनाचे गाळप केले आहे. यामध्ये ८० हजार टन कार्यक्षेत्रातून ऊस गळप केला आहे.अजून १ लाख २० हजार टन ऊस कार्यक्षेत्रात गळपासाठी उपलब्ध आहे. क्रमपाळीने ऊस उचलला जात आहे. हती व गवे बाधीत क्षेत्रातील ऊस उचलण्यावर प्राधान्य दिले आहे. वेळाने गळपासाठी येणाऱ्या ऊसाला उशिराचे अनुदान देण्यासाठी प्रयत्नशील आहे. टोळ्यांनी खुशालीची मागणी केल्यास कारखाना प्रशासनाशी संपर्क साधावा. कार्यक्षेत्रातील व करार केलेला शेतकऱ्याचा ऊस गाळपाची जबाबदारी कारखाना प्रशासनची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस घालण्यासाठी कोणतीही घाई करू नये. ऊस आजरा कारखान्याला पाठवावा, असे आव्हान त्यांनी केले.