गडहिंग्लज : रविवारी श्री काळभैरव संस्थापक पॅनेल प्रचाराचा शुभारंभ तसेच कार्यालयाच्या उदघाटन संपन्न अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
ह्यावेळी पॅनेलचे प्रमुख किशोर हंजी यांनी सर्वांचे स्वागत केले व बँकेच्या आतापर्यंतच्या प्रगतीची पार्श्वभूमी सांगितली.
तसेच हरी महादेव मुसळे, श्री एल डी पोवार, श्री काशिनाथ घुगरी, श्री बसवराज हिदडूगी व श्री विकास पाटील यांच्या हस्ते फोटोचे पूजन झाले.
श्री उदय जोशी,सिद्धार्थ बने श्री किरण कदम व श्री बाळासाहेब कोणकरी यांनी आपली मनोगते व्यक्त केली. व मनोगतात आपण पॅनेलच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत तसेच पुन्हा एकदा ह्या पॅनल ला जिंकवून देण्याचे आवाहन केले. तसेच ज्येष्ठ संचालक श्री व्ही एस पाटील श्री रमेश रिंगणे, ऍडव्होकेट भोसकी अण्णा, श्री हारून सय्यद,श्री महादेव पाटील, श्री संजय खोत, श्री राजू पट्टणशेट्टी, श्री बाळासाहेब बंदी,श्री अरुण कलाल, श्री मानसिंग देसाई, श्री प्रकाश शहा, डॉ एस एम कोल्हापूरे, श्री नीलकंठ हिरेमठ, श्री प्रशांत हिरेमठ, श्री विरेंद्र चौगुले या सर्वांच्या हस्ते नारळ वाढवून पॅनेल मधील सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.ह्यावेळी पॅनेलचे हितचिंतक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच अपक्ष उमेदवार श्री महेश घुगरी यांनी देखील ह्यावेळी ह्या पॅनेलला जाहीर पाठिंबा दिला.