गडहिंग्लज, ता. १० : येथील आगारात नव्या अठरा बस दाखल झाल्या आहेत. भाविकांची मागणी लक्षात घेऊन गडहिंग्लज- गाणगापूर ही नवी बस फेरी सुरू केली आहे.
नव्या अद्ययावत गाड्यांमुळे भाविकांचे प्रवास आरामदायी होणार आहे. ठाणे, भोईसर परिसरात जाणाऱ्या प्रवाशांसाठीही नवी गाडी सुरू झाली आहे. पुढील आठवड्यात बीडला नवी गाडी सुरू झाली आहे. पुढील आठवड्यात बीडला नवी गाडी सुरू होणार आहे. लांब पल्ल्याच्या ठिकाणी मागणी असणाऱ्या मार्गावर या गाड्या प्राधान्याने सोडण्यात आल्या असल्याची माहिती आगारप्रमुख संजय चव्हाण यांनी दिली. गडहिंग्लज -गाणगापूर ही बस सुरू करण्यात आली आहे. दत्त, अक्कलकोट आणि पंढरपूरला जाणाऱ्या भक्तांची या एकाच बसमुळे चांगली सोय होणार आहे. पंढरपूरला आणखी एक जादा फेरी दुपारी सुरू करण्यात आली आहे. या अद्ययावत बसमध्ये पुशबॅक सीटची सोय आहे.