हेरे सरंजामप्रश्र्नी आज महसूलमंत्री विखे - पाटील यांच्या दालनात बैठक

KolhapurLive

चंदगड : चंदगड तालुक्यातील ४७ गावातील हेरे सरंजामच्या वर्ग दोनच्या जमीन वर्ग एक करण्याबाबत बुधवार दि. 11 जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता मुंबई मंत्रालयातील विस्तारित इमारतीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती भारतीय जनता माथाडी जनरल कामगार संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी दिली.
    तालुक्यातील ४७ गावे ही हेरे सरजाम वतनाखालील असून या गावातील शंभर टक्के जमिनीच्या सातबारा पत्राकी धारणा प्रकार  वर्ग - 2 व इतर हक्कातील नवीन अविभाज्य शर्थ अशा नोंद झालेल्या आहेत. हिरे सरंजाम वतनाच्या जमीन वर्ग -१ करून देण्याबाबत यापूर्वीच शासन निर्णय पारीत झाला आहे.
          त्या अनुषंगाने काही प्रमाणातील जमिनीची भोगवटदारांना वर्ग - २ ची अट कमी करून भोगवटदार- १ अशी नोंदी झालेल्या आहेत.त्या फक्त काही प्रमाणात म्हणजेच अंदाजीत १० टक्के पेक्षा कमी जमिनी बाबत शासन दरबारी ही कार्यवाही झालेली आहे. तसेच सदरील जमीन मिळकतीच्या खरेदी- विक्री कामी तसेच बँक कर्ज, शेती पीक कर्ज उचल करण्याकामी अत्यंत अडचणी येत असल्याने सदरील जमीन मिळकती शासनाच्या ऑनलाइन प्रणालीमधून सक्षम अधिकाऱ्यांकडून गट खुले करण्यासाठी करावे लागणार प्रस्ताव सादर करण्यासाठी शेतकरी वर्गाला प्रस्ताव सादर करून त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी काही महिने वर्ष सुद्धा लागत आहेत. त्यामुळे चंदगड तालुक्यातील शेतकरी लालफितील कारभाराला वैतागला असून तात्काळ वर्ग-२ च्या जमीनी वर्ग - १ करून देण्यासंदर्भात सर्व महसूल विभागातील अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून हिरे सरंजामप्रश्न मार्गी लावण्यातील अडचणी दूर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.